गुरुनाथ विष्णू नाईक

guru
Gurunath Naik
रहस्यकथा लेखक

जन्म दिनाक: 12-02-1955

मराठीतील सुप्रसिद्ध रहस्यकथा लेखक.

बाबुराव अर्नाळकरांप्रमाणेच त्यांनीही शेकडो रहस्यमय कादंबऱ्या लिहील्या.  त्यांच्या रहस्यकथांनी एकेकाळी संपूर्ण पिढीला वेड लावले होते.

दर महिन्याला ते सरासरी शंभर पानांच्या ७-८ कादंबऱ्या ते सहज लिहित. प्रत्येक कादंबरीच्या चार ते पाच हजार प्रति खपत असत.

१९७० ते १९८२ या काळात त्यांनी ७२४ रहस्य व गूढकथा लिहिल्या. यात सैनिकी जीवनावरील २५० शिलेदार कादंबऱ्या आहेत.

गोलंदाज ही काल्पनिक व्यक्तिरेखा तसेच कॅप्टन दीप, मेजर भोसले ही त्यांची पात्रे रहस्यकथा वाचणाऱ्या वाचकांच्या मनात घर करून बसली आहेत.


मराठीसृष्टीवरील लेख: https://www.marathisrushti.com
मराठीबुक्स वरील पुस्तके: https://www.marathibooks.com/gn
आम्ही साहित्यिक फेसबुक ग्रुपवरील लेख : https://www.facebook.com/gn


Listing
b - 12-02-1955
LS - Alive
sgms