कमलाकर नाडकर्णी जन्म १० जानेवारी १९३५ रोजी झाला.
कमलाकर नाडकर्णी गेली पन्नास हून अधिक वर्षे नाट्यसमीक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी पाच नाटकांचे अनुवाद केले आहेत. एक स्वतंत्र बालनाट्य लिहिले आहे. कमलाकर नाडकर्णी हे सुधा करमरकर यांच्या बालनाट्य संस्थेत पंधरा वर्षे लेखक, दिग्दर्शक व कलावंत म्हणून कार्यरत होते. त्यांना उत्कृष्ट नाट्यपरीक्षक म्हणून सहा पुरस्कार मिळाले आहेत.
कमलाकर नाडकर्णी यांना माधव मनोहर पुरस्कार मिळाला आहे तसेच कमलाकर नाडकर्णी यांना अखिल भारतीय नाट्यपरिषदेने जीवनगौरव सन्मान देऊन गौरव केला आहे.