केशवराव जेधे

Keshavrao Jedhe
स्वातंत्र्यसेनानी, पत्रकार, संपादक,
जन्म दिनाक: २१ एप्रिल १८९६
मृत्यू दिनांक: १२ नोव्हेंबर १९५९

भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे अग्रगण्य स्वातंत्र्यसेनानी, पत्रकार, संपादक, खेडोपाडी कॉंग्रेस पोचविणारे आणि संयुक्ती महाराष्ट्र चळवळीचे नेते केशवराव मारुतराव जेधे यांचा जन्म २१ एप्रिल १८९६ रोजी पुणे येथे झाला.

जेधे कुटुंब महात्मा फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाचे पाठीराखे होते. त्यांनी तरुण मराठा पक्ष स्थापन केला आणि वर्ष १९२३ मध्ये त्याच्या प्रचारार्थ ‘शिवस्मारक’ हे साप्ताहिक काढले. वर्ष १९२७ मध्ये ‘कैवारी’ या साप्ताहिकाचे ते सहसंपादक झाले. तर मजूर हे वृत्तपत्र त्यांनी चालविले.

गणेशोत्सवाच्या ब्राह्मणीकरणाला शह देण्यासाठी त्यांनी काढलेल्या मेळ्यातील गीते आक्रमक शैलीतील होती.

लोकमान्य टिळकांनंतर पुण्यातून जेधे यांनीच कॉंग्रेसला संजीवनी दिली. त्यांच्या कारकिर्दीमध्येच पुण्याचे कॉंग्रेस भवन उभे राहिले.

“देशाचे दुश्मन” हे त्यावेळी (१९२५) वादग्रस्त ठरलेले पुस्तक त्यांनी लिहिले होते.

केशवराव जेधे यांचे १२ नोव्हेंबर १९५९ रोजी निधन झाले.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.