कुमार केतकर

Kumar Ketkar

४० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव अणि खर्‍या अर्थाने जगरहाटी करुन निष्ठेने पत्रकारिता करणारे ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर हे पक्के ठाणेकर.  आठ वर्षं “महाराष्ट्र टाईम्स”, त्यानंतरची सात वर्षे “लोकसत्ता”, नंतर `लोकमत’ आणि शेवटी `दिव्य मराठी’  या मराठी दैनिकांचे मुख्य संपादकपद त्यांनी भूषविले आहे.

अर्थशास्त्रातील उत्कृष्ट लेखनाबद्दल “चिंतामणराव देशमुख” पुरस्कार त्यांना देण्यात आला त्याचबरोबर “राजीव गांधी” पुरस्कार, “रत्नदर्पण” पुरस्कार, “जाएन्ट्स आंतरराष्ट्रीय” पुरस्कार देण्यात आला.

त्यांना २००१ साली पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं आहे.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.