मधुसूदन पांडुरंग भावे

Madhusudan Pandurang Bhave


नाशिक येथे जन्मलेल्या मधुसूदन पांडुरंग भावे हे बेस्टमध्ये रूजू होऊन त्यांनी अनेक वर्षे प्रवाशांची निरपेक्ष सेवा केली. साहित्याची निस्सीम ओढ त्यांना, केवळ नोकरी व कुटुंबाच्या चक्रामध्ये फसू देत नसल्यामुळे त्यांनी ही लिखाणाची आंतरिक उर्मी कागदावर नियमितपणे उतरविण्यास सुरूवात केली. पुढे प्रकृती स्वास्थ्य बिघडल्यामुळे त्यांनी बेस्टची नोकरी सोडली, व प्राणापणाने जोपासलेली, वाङ्मय प्रतिज्ञा ह्याच क्षणाला उफाळून वर आल्यामुळे या क्षेत्रात येण्यासाठी आपली बौध्दीक क्षमतापणाला लावली. मितभाषी, मृदु स्वभाव, तरीही आतून मिश्कील असलेले भावे आकाशवाणीची मान्यता मिळविण्यास सफल झाले, आणि तेथूनच गीतकार म्हणून त्यांच्या प्रवास सुरु झाला. ठाणे म्हटले, की काही नामांकित व्यक्तींचा आवर्जून उल्लेख होतो. त्या नावांचा यादित मधुसूदन भावेंच्या नावाचा सामावेश झाला आहे.

दैनिक गावकरी च्या पुरवणीवरुन संपादित