०७ जून १९१३
१९१३> मराठी वाङ्मयविषयक लिखाणाला नवी दृष्टी देणारे समीक्षक, साहित्यिक मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष यांचा जन्म. “अभिरुची” मासिकातून “निषाद” या टोपण नावाने ते वादसंवाद हे सदर लिहित. “पाच कवी” हे आधुनिक कवितांचे त्यांनी केलेले पहिले संपादन. “खडेंघाशी”, “शालजोडी”, “अम्लान”, “पंचम” हे लघुनिबंध संग्रह, “शब्दयात्रा” हा साहित्यविषयक टिपणांचा संग्रह आणि “भाषाविवेक” ही त्यांची मराठी पुस्तके. “हिस्टरी ऑफ मराठी लिटरेचर” हा अभ्यासपूर्ण इंग्रजी ग्रंथही त्यांचा. पु.ल. देशपांडे व रामचंद्र वा. अलुकर यांच्यासह” “पुरुषराज” अळुरपांडे” या टोपणनावाने लिहिलेले लेख तर सहलेखनाचे आणि सहजलेखनातल्या मार्मिकतेचे अद्वितीय उदाहरणच. २०१० साली मं.वि निवर्तले.
mss