नयन नरोत्तम कीर

Mrs. NAYAN NAROTTAM KEER


मी रुपारेल काॅलेज मुंबई येथून रसायन शास्त्रात पदवी घेतली. तत्पुर्वी मी वयाच्या १४ व्या वर्षी हिन्दी विशारद पदवी प्राप्त केली होती. १९७१ मध्ये विवाह झाला. नंतर १९९० पर्यंत तीन मुलांचे संगोपन व शिक्षण यांत गुंतले. १९९० मध्ये महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विकास केंद्राद्वारे शिक्षण घेतले. स्वत:चा व्यवसाय सुरू केला. फॅशनेबल ब्लाॅउज शिवणे, स्क्रीन प्रिंन्टीग व मुलांच्या मदतीने पिसिबी मॅन्युफॅक्चरींग इ.

त्यानंतर २००४ नंतर पुत्रवियोगातून मी भविष्य विषयाकडे वळले. त्यात रस घेतला व सर्टिफिकेटस् प्राप्त केली. व्यावसायिक भविष्य व्यवसाय सुरू केला. वास्तु तज्ञ झाले. लोकानां चांगले अनुभव आले व त्यातूनच मला अधिकाधिक ग्राहक मिळत गेलै.

या सर्व व्यापात माझ्यातील साहित्यिक जागा होता. मी छोट्या छोट्या कविता, गोष्टी, चारोळ्या लिहून ठेवत असे. ही गोष्ट मी कुटुंबियापासून लपवून ठेवली होती. २०२१ मध्ये माझी नात हरिकृपामुळे मी तो ठेवा तिला दाखवला. ती संगणक माहितगार असल्यामुळे तिने तो ठेवा माझ्या फेसबुकवर टाकला. तो ठेवा मी मरठी श्रृष्टीवर शेअर करू शकते कां?