नागराथ संतराम इनामदार

ना. सं. इनामदार
Nagrath Santram Inamdar
जन्म दिनाक: २३ नोव्हेंबर १९२३
मृत्यू दिनांक: १६ ऑक्टोबर २००२

ना.सं. इनामदार हे मराठीतले श्रेष्ठ इतिहासिक कांदबरीकार होते. त्यांचा जन्म २३ नोव्हेंबर १९२३ रोजी झाला. इतिहास काळातील उपेक्षित पात्रांना न्याय देणारा लेखक अशी ओळख त्यांची कायम मराठी वाचकाला राहील. कांदबरीमध्ये काय सांगितले आहे, त्याच्या ऐवढेच महत्त्व ते कसे संगितले आहे, या गोष्टीला असते.

इतिहासाचा विपर्यास होऊ नये यासाठी संशोधन, इतिहासाचे सर्जनशील आकलन, आणि प्रसंगातील नाटयमयता व चित्रदर्शी शैली यामुळे ते कांदबरीकार ठरले. त्यांच्या ऐतिहासिक कांदबरीला मराठीत तोड नाही. 1857 च्या स्वांतत्र्यसमरावर लिहीलेली `बंड` ही त्यांची पहिली कांदबरी, परंतु प्रसिध्द होण्यास मात्र 1996 साल उजाडले. त्या समराच्या शताब्दीच्या निमित्ताने त्यांनी ती लिहली होती.

झेप ही त्यांची प्रथम प्रसिध्द झालेली कांदबरी, दुसरी ऐतिहासिक कांदबरी 1963 साली प्रकाशित झाली. मराठीशाही आणि पेशवे कालातील यांच्या कालखंडातील अनेक व्यक्तिचा मागोवा त्यांनी घेतला.

त्यांचे निधन १६ ऑक्टोबर २००२ रोजी झाले.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.