पुरुषोत्तम भास्कर भावे

Purushottam Bhasakar Bhave
थोर साहित्यिक

जन्म दिनाक: १२ एप्रिल १९१०
मृत्यू दिनांक: १३ ऑगस्ट १९८०

थोर साहित्यिक पुरुषोत्तम भास्कर भावे यांचा जन्म १२ एप्रिल १९१० रोजी झाला.

पु. भा. यांचे नाव मराठी नवकथेचे जनक म्हणून घेतले जाते. कथालेखक म्हणून ते युगप्रवर्तक ठरले. त्यांच्या सतरा कादंबर्‍यांनी मराठी भाषेत नवतारुण्य आणले. नाटककार म्हणून ते मखमली पडद्यावर आले. नंतर रजपटावर झळकले.

पु.भा.भावे यांची सहित्य संपदा विशाल व सर्वस्पर्शी अशी होती. ६ नाटके, २ प्रवासवर्णन, २ व्यक्तिचित्रे, २८ कथासंग्रह, १८ लेखसंग्रह, निवडक कथा संग्रहाचे दोन भाग इतके त्यांचे साहित्य प्रसिद्ध झाले. त्यांचे “प्रथम पुरुष एकवचनी” नावाच्या आत्मचरित्राचे तीन खंडही प्रसिद्ध आहेत.

मे १९५४ मध्ये अखिल भारतीय नाट्यसंमेलनाचे ते अध्यक्ष झाले होते. १९६७ मध्ये विदर्भ साहित्य संमेलन, तसेच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलानाचे ते अध्यक्ष होते. १९७७ मध्ये झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यानीच भूषविले होते.पु.भा.भावे यांचे वक्तृत्त्वही अमोघ होते.

पु.भा.भावे यांचे १३ ऑगस्ट १९८० रोजी निधन झाले.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.




Listing
b - १२ एप्रिल १९१०
d - १३ ऑगस्ट १९८०
LS - Dead