२६ जुलै १९८६
१९८६> तत्वचिंतक, कादंबरीकार पुरुषोत्तम यशवंत देशपांडे यांचे निधन. विधि महाविद्यालयात प्राध्यापक असणार्या पु.यं. नी पाच कादंबर्या लिहिल्या. मात्र “सोविएत रशिया आणि हिंदुस्थान” तसेच “गांधीजीच का?” या वैचारिक लिखाणामुळे ते प्रकाशात आले. “नवी मुल्ये” या निबंधसंग्रहातून त्यांची संस्कृतिविषयक नवी जाणीव स्पष्ट होते. याशिवाय “अनामिकाची चिंतनिका” हा तात्विक ग्रंथ आणि दोन खंडांचे “अनुभवामृत – रसरहस्य” ही त्यांच्या विद्वत्तेची साक्ष देणारी पुस्तके होत.
mss