रघुनाथ वामन दिघे

Raghunath Waman Dighe
जन्म दिनाक: २४ एप्रिल १८९६
मृत्यू दिनांक: ४ जुलै १९८०

रघुनाथ वामन दिघे यांचा जन्म २४ एप्रिल १८९६ रोजी कल्याण येथे झाला.

रघुनाथ वामन दिघे यांच्या पुष्कळशा कादंबऱ्या ग्रामीण पार्श्वभूमीचे चित्रण करणाऱ्या आहेत. त्यांच्या लिखाणातील नायक हा बहुधा वारकरी आणि शेतकरी असायचा. हा नायक शेतकरी वारकरी संप्रदायाची मूल्ये जपतो आणि निसर्गाच्या आपत्तीशी त्यानुसार झगडा देतो. संतांच्या शिकवणीतून हा मुकाबला तो कसा करतो, याची त्या कादंबऱ्यांमध्ये उत्तम वर्णने वाचायला मिळतात.

“पाणकळा” या पहिल्याच कादंबरीतून दिघ्यांची लेखनातील मनोहारी वैशिष्ट्ये स्पष्ट झाली. ग्रामीण व कृषीजीवनाच्या वास्तववादी चित्राचे दर्शन त्यांच्या “आई शेतात आहे” व “पड रे पान्या” या कादंबर्‍यांतून दिसते. सराई पूर्तता, निसर्गकन्या, रानजाई या कादंबर्‍यांनी दिघ्यांना प्रादेशिक कादंबरीकार, असा नावलौकिक मिळवून दिला.

आपल्या कथा-कादंबर्‍यांतून शेतकरी आणि कष्टकर्‍यांचे प्रश्न हाताळणार्‍या रघुनाथ वामन दिघे यांचे निधन दिनांक ४ जुलै १९८० रोजी झाले.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.