MBA, HRD विद्याविभूषत सत्येन वयाच्या १८ व्या वर्षापासून रस्ते वहातुक सुरक्षा कार्यात काम करत आहेत. शालेय विद्यार्थ्यांना वहातुकीचे सुरक्षा नियम व पालन शिकण्यावर त्यांचा विशेष भर असून वहातूक पोलीस कार्यालय आयोजित शंभराहून अधिक शिबीरांद्वारे अंदाजे १०००० विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शन केले आहे. विशेष म्हणजे, सुलभ सुरक्षित वहातुकीसाठी त्यांनी स्वखर्चाने उपकरणे तयार केली असून बडोद्यातील रस्त्यांवर वहातुक विभागातर्फे त्याचा वापर होतो.
रस्ते वहातुक संदर्भातील सरकारी समित्यांमध्ये कुलाबकर यांना आदराचे स्थान असून विद्यार्थ्यांपासून ते जेष्ठ नागरीक व वहातुक पोलीस यामधील कुलाबकर महत्वाचा दुवा आहेत. वरील कार्याव्यतिरिक्त सत्येन यांची महाराजा सयाजीराव विद्यापीठाच्या बिझिनेस मॅनेजमेंट विषयासाठी सीनेटमध्ये मध्ये निवड झाली असून महत्वाच्या शैक्षणिक व्यवस्थापन संदर्भात ही सीनेट कार्यरत आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावरील व ३०००० स्पर्धकांनी भाग घेतलेल्या वडोदरा मॅरोथॉन च्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्समध्ये ते आहेत. वडोदरा मॅरोथॉन द्वारे आयोजित रोड सेफ्टी पेंटिंग स्पर्धेमधील जागतिक विक्रम गीनिज बुक वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवला गेला आहे.
सत्येन कुलाबकर यांना केंद्र सरकार तर्फे नॅशनल रोड सेफ्टी अर्वार्डने गौरवण्यात आले. मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट अँड हायवेजस् तर्फे सत्येन यांना हा पुरस्कार दिल्ली येथे प्रदान करण्यात आला.