‘धिंड,‘नाटक’,‘मिटिंग’ यासारख्या ग्रामीण कथांच्या रसिकांपर्यंत पोहोचलेल्या शंकर पाटील यांचा जन्म ८ ऑगस्ट १९२६ रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील पट्टणकोडोली येथे झाला.
ग्रामीण कथाकथनाचा प्रकार त्यांनी (व्यंकटेश माडगूळकर आणि द.मा. मिरासदार यांच्या साथीने) रुळवला. अ.भा. साहित्य संमेलनाचे (१९८५, नांदेड) ते अध्यक्ष होते.
वळीव, धिंड, भेटीगाठी, खुळ्याची चावडी, खेळखंडोबाचा आदी कथासंग्रह तर “टारफुला” ही कादंबरी गाजली. “एक गाव बारा भानगडी”, “पाहुणी” आदी चित्रपटांच्या पटकथाही त्यांच्याच.
ग्रामीण साहित्याला हसरा चेहरा देणारे कथाकार शंकर बाबाजी पाटील यांचे ३० जुलै १९९४ रोजी निधन झाले.