दाते, शंकर गणेश – 0188
१० डिसेंबर १९६४
१९६४> सूचिकार शंकर गणेश दाते यांचे निधन. लोककथा (दोन खंड) व सवत: २३ हजार ग्रंथ चाळून मराठी ग्रंथसूचीचे दोन खंड त्यांनी प्रसिद्ध केले. राष्ट्रीय ग्रंथसूचीतील मराठी विभागाची जबाबदारी त्यांनीच पार पाडली. मराठी नियतकालिक सूची मात्र त्यांच्या अकाली निधनाने अपूर्ण राहिली.
———————————————————————————————————————————————————————————————————
दाते, शंकर गणेश – 367
१७ ऑगस्ट १९०४
१९०४> ग्रंथसूचीकार म्हणून स्वत:चा ठसा उमटवणारे शंकर गणेश दाते यांचा जन्म. दुर्मीळ ग्रंथसंग्रहाच्या ध्यासातून त्यांनी सूचीकार्य सुरु केले. पुढे १८०० ते १९३७ आणि १९३८ ते १९५० असे त्यांनी केलेल्या ग्रंथसूचींचे दोन खंड “दाते ग्रंथ सूची” या नावाने प्रकाशित झाले. प्रकाशित ग्रंथांची माहिती एकत्रित करण्याच्या त्यांच्या महत्कार्याची दखल घेऊन “राष्ट्रीय ग्रंथसूची” चे काम त्यांच्याकडे सोपविण्यात आले होते. पण ते आकारास येण्यापूर्वी (१९६४) त्यांचे निधन झाले.
mss