शांताबाई शेळके या सुप्रसिद्ध मराठी कवियत्री , गीतकार आणि लघुनिबंधकार होत्या. त्यांच्या कवितांनी आणि त्यावर बनलेल्या गाण्यांनी उभ्या महाराष्ट्राला वेड लावले आहे.
शांता शेळके यांचा जन्म १२ ऑक्टोबर १९२२ रोजी झाला.
कथा-कादंबरीसह साहित्याच्या सर्व क्षेत्रांत मुशाफिरी करणार्या शांताबाईंच्या नावावर १०० हून अधिक पुस्तके आहेत. शांताबाईच्या पुस्तकांत येडबंबू शंभू, सारखी बालकविता, पावसाआधीचा पाऊस, सारखा ललितरम्य लेख, असे वैविध्य सापडेल…
गीतकार म्हणून त्यांनी जगण्याचा मोठा पट कवेत घेतलाच, पण ललितलेखांतून त्या व्यक्त होत राहिल्या.
एकपानी, किंवा पाऊसा आधीचा पाऊस, सारखे लघुनिबंध संग्रह, किनारे मनाचे, हे त्यांच्या निवडक कवितांचे संकलन कालिदासाच्या मेघदूताचा अनुवाद, हायकू, त्यांनी लिहिलेली चित्रपटगीते, त्यांच्या लेखणीतून उमटणारे सामाजिक, सांस्कृतिक स्थित्यंतरांचे पडसाद असे बरेच काही मागे ठेवून त्या गेल्या.
वर्षा, गोंदण, पूर्वसंध्या, इत्यर्थ (काव्यसंग्रह), धर्म, पुनर्जन्म (कादंबर्या), अनुबंध मुक्ता, प्रेमिक (कथासंग्रह) वडिलधारी माणसे (व्यक्तिचित्रे) धूळपाटी (आत्मपर), मेघदूत, जपानी हायकू (अनुवाद) अशी बहुविधा त्यांनी लीलया हाताळली.
६ जून २००२ रोजी त्यांचे निधन झाले.