प्राच्यविद्यापंडित, आंतरराष्ट्रीय विचारवंत आणि कृतीशील सामाजिक कार्यकर्ते म्हणुन ख्याती असलेल्या शरद पाटील हे सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक होते.१९४५ मध्ये जे. जे. स्कूल ऑफ आर्ट मुंबई येथील शिक्षण अर्धवट सोडून कम्युनिस्ट चळवळीत त्यांनी सक्रीय सहभाग नोंदवला. १९७८ मध्ये कम्युनिस्ट पक्षातून बाहेर पडत “सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षा”ची स्थापना केली. त्या माध्यमातून त्यांनी आदिवासी शेतमजूर यासारखे विविध लढे उभारले.
महाराष्ट्राच्या तेराव्या विधानसभेतील आमदारपद शरद पाटील यांनी भुषविले होते. इंग्रजी व मराठी भाषेवर प्रचंड प्रभुत्त्व असलेल्या पाटील यांनी त्यांनी दोन्ही भाषांमध्ये विपुल लेखन केले आहे. त्यांच्या प्रमुख पुस्तक आणि ग्रंथनिमिर्तीत “दास – शुद्रांची गुलामगिरी”, रामायण-महाभारतातील वर्ण संघर्ष खंड १ भाग ३”,“जाती व्यवस्थापक सामंती सेवकतत्त्व हे इंग्रजी व मराठी खंड २ भाग १” तसेच “शिवाजीच्या हिंदवी स्वराज्याचे खरे शत्रू को ?-खंड भाग २”,“जात्यंतक भांडवलदारी”,“लोकशाही क्रांती व तिची समाजवादी कृती”, खंड ३ तर खंड ४ मध्ये प्रिमिटिव्ह कम्युनिझम मातृसत्ता-स्त्रीसत्ता आणि भारतीय समाजवाद” असे चार खंड लिहिले ”असून इतर पुस्तकांमध्ये “मार्क्सवाद-फुले- आंबेडकरवाद”,“स्वातंत्र्य व समतेचा अग्निस्रोत”,“पश्चिम भारतीय स्वायत्त आदिवासी राज्याची भूमिका”,“स्त्री शूद्रांच्या स्वराज्याचा राजा”, “शोध”, “मूलनिवासींचा की शूद्र वर्णाचा जात्यंतक समतेचा?”,“नामांतर-औरंगाबाद आणि पुण्याचे”,“बुध्द”,“भिक्खू”,“आनंद”,“धम्म-आनंद-वधू”,“विशाखा” यांचा समावेश आहे.
रा.ना.चव्हाण प्रतिष्ठान, वाई इथला १८ वा महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुरस्काराने शरद पाटील यांना गौरवित करण्यात आले होते; १३ एप्रिल २०१४ या दिवशी वयाच्या ८९ वर्षी कॉम्रेड.शरद पाटील यांचे धुळे येथील त्यांच्या रहात्या घरी निधन झाले.