शशिकांत कोनकर

Shashikant Konkar


त्यांनी कथांपासून सुरुवात करुन कादंबर्‍या, नाटके ह्या साहित्यप्रकारात स्वत:चा ठसा उमटवला तसेच त्यांना ह्या क्षेत्रात अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. विद्या विकास केंद्र व कोनकर स्टडीजचे ते संचालक असून ६००० कॉमर्स विद्यार्थ्यांना त्यांनी शिकवले आहे. साहित्य परिषदेचे ते अध्यक्ष होते. तसेच ते नाट्यभिमानी संस्थेचे अध्यक्ष होते. “अभ्यास कसा कराल ?”, “यश निश्चित” ही व्यक्तिमत्व विकासाची पुस्तके त्यांनी लिहिली आहेत. त्यांचे महत्वाचे योगदान म्हणजे त्यांनी अनेक कॉमर्सच्या गरीब विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण दिले. पद्मश्री अनुताई वाघांवर थिसिस लिहून त्यांनी परदेशातून ठाणे जिल्ह्यातील आदीवासींना मदत उपलब्ध करुन दिली. तसेच आदीवासींना मोफत औषधे व पुस्तके पुरवठा ही त्यांनी केला. सुमारे दीडवर्ष कोसबाड, दीमोण येथील आदीवासींमध्ये वास्तव्य करुन त्यांच्या पाड्यातील शाळांसाठी त्यांनी मदत केली.

शशीकांत कोनकर ह्यांच्या मते ठाणे हे जणू मुंबईजवळचे पुणे आहे. उद्याच्या ठाण्याकडे पाहताना ते म्हणतात की ते नितांत सुंदर, स्वच्छ व संस्कृती जपणारे असावे. ठाणे विद्येचे माहेरघर आहे असंही ते म्हणतात.

अशा या बहुआयामी व्यक्तिमत्वाकडे पाहताना  सामाजिक क्षेत्रातील त्यांची कर्तबगारी ओळखताना ठाणेकरांना नक्कीच त्यांचा अभिमान आहे.

आतापर्यंत ठाणे महानगरपालिकेच्या गुणीजन पुरस्कार ठाणे गौरव, सं. पां. जोशी नाटककार पुरस्कार पु. भा. भावे ह्याची २ स्मृति चिन्हे तसेच इंदोर साहित्य रत्न पुरस्कार ह्या व अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानीत करण्यात आले आहे.