लेखन आणि बुद्धीबळ ह्या क्षेत्रात स्वत:चा ठसा उमटविणारे ठाण्यातील एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व म्हणजे शिरीष वामन हिंगणे.
“काय पाहिलस माझ्यात?”, “गंगुबाई नॉनमॅट्रीक” ह्या व अशा अनेक मालीकांत एपिसोड लेखन त्यांनी केले. “पूजा” ह्य अध्यात्मिक मासिकाचे ते संपादक आहेत. मुंबई विद्यापिठाच्या बहि:शाल विभागातर्फे काही वर्षं ते नाट्यलेखन तंत्रावर व्याख्यानही देत होते. महाराष्ट्र राज्य (ज्यू) बुद्धीबळ स्पर्धेचे ते विजेते आहेत. तसेच अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बुद्धीबळ स्पर्धेत सहभागीही झाले आहेत. मुंबई विद्यापीठ संघाचे नेतृत्वही केले आहे. त्यांनी अनेक चॅनल्ससाठी, कार्टून फिल्मसाठी लेखन तसचं महाराष्ट्र राज्य साक्षरतेसाठी लेखन केलं आहे.
“जान तेरे नाम” व “परीस्पर्श” ही त्यांची नाटकं महाराष्ट्र राज्य नाट्य पुरस्कार विजेती नाटकं होती. त्यांची “दंगा” ही एकांकिका आंतरविद्यापीठ स्पर्धेत प्रथम आली.