सुभाष परशुराम रासम

Subhash Parshuram Rasam


ठाणे शहरात फार थोडी अशी व्यक्तिमत्व आहेत जी अष्टपैलू म्हणून गणली जातात. त्यापैकीच एक म्हणजे सुभाष परशुराम रासम हे होय! बी.ए. पदवीधर, इंटिरीयर डिझायनर, वास्तुशास्त्र पदविका, ज्योतिशास्त्र विशारद अशा विविध क्षेत्रांतील पदव्या आणि पदविका रासम यांनी प्राप्त केल्या आहेत आणि या सर्वच क्षेत्रात ते कार्यरतही आहेत. महाराष्ट्र शासनाने विशेश कार्यकारी अधिकारी असलेल्या रासम यांनी “या हात पाहू या!” हे हस्त सामुद्रिक व वास्तुशास्त्र विषयक लेखन प्रसिद्ध झालं आहे.

मनातील ठाणे :
ठाण्याविषयी ते बोलतात की, कालचं ठाणे हे तलाव आणि मंदिराचं वैभवसंपन्न शहर आणि बंदर होतं. आजचं ठाणे एक औद्योगिक नगरी, गृहनिर्माणात अग्रेसर, विस्तृत, सुनियोजित रस्ते, उर्जेबाबत जागरुकता, सुशोभित तलाव, कलासंपन्न इमारती आणि महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती उच्चस्थानी विराजित करणारी अत्याधुनिक नगरी आहे. अनेक पुरस्कार प्राप्त करुन देश विदेशात विख्यात असलेली ठाणे नगरी ही ठाण्याची आजची ओळख आहे. उद्याचं ठाणे हे एक प्रगत, आधुनिक तरीही जिव्हाळ्याचं, आपुलकीचं शहर असेल.

पुरस्कार : त्यांना आजवर “संस्कृती पुरस्कार”, “परिवर्तन पुरस्कार”, “करिअर आयडॉल” असे अनेक पुरस्कार मिळाले आहेत.