Sudha Mokashi

वयाच्या आठराव्या वर्षापासून काव्यलेखनास प्रारंभ. - टेलीकम्युनिकेशन मधील नोकरीतून १९८८ मध्ये स्वेच्छानिवृत्ती. - तीन काव्यसंग्रह प्रसिद्ध १) अबोली - महाराष्ट्र राज्य अनुदान प्राप्त २) लाख आठवांचे दिवे - विश्व मानव एकता २००० पुरस्कार प्राप्त ३) मिळूनी सार्‍या गाऊ - गीत संग्रह तृतीय आवृत्ती प्रकाशित - काव्य प्रेमी कला प्रतिष्ठान उपाध्यक्षपदी ६ वर्षे - नीलपुष्प साहित्य मंडळ - कार्यकारी सभासद - म.सा.प व को. म.सा. प साहित्य संमेलनात, कवी संमेलनात सहभाग - शब्दांगण, मेनका, माहेर, वसुधा, अनुराग, ऑल दि बेस्ट, कायस्थ प्रबोधन, कायस्थ विकास, उत्तम कथा, वहिनी व इतर अनेक मासिकातून कथा, ललित लेखन विशेषत: कविता प्रसिद्ध - कमलाबाई सोवनी पुरस्कार, रुणाली पुरस्कार व अनेक कवितांना बक्षीसे, - चां.कां. प्रभू महिला गौरव पुरस्कार प्राप्त, स.पां. जोशी पुरस्कार, ठाणे गौरव पुरस्कार, कै. सुशीलाबाई कदम काव्य पुरस्कार - आकाशवाणीवर पुस्तक परिक्षण व महिलांसाठी कार्यक्रम सादर. - स्वरचित काव्यमय स्त्री जीवन कार्यक्रमाचे पासष्ट कार्यक्रम पुणे, अंबरनाथ, कल्याण, पार्ले, ठाणे येथील विविध संस्थातून सादर. - दै. सन्मित्रमध्ये पुस्तक परिक्षणे सदरासाठी नियमित लेखन. (संदर्भ : स्वतः दिलेल्या माहितीवरुन)




सुधा मोकाशी