सुरेश वासुदेव नाईक

Suresh Vasudev Naik

B.Sc, L.L.B., D.L.W. (Mumbai) i.e. Post Graduate Diploma in Labour Welfare And Personnel Management

हिंदी : प्राज्ञ, संस्कृत : द्वितीया, चित्रकला: इंटरमिजिएट. सर्व परीक्षा उत्तमरित्या उत्तीर्ण.

मराठी / हिंदी / इंग्रजी भाषांचा व्यासंग, बर्‍यापैकी चांगला अभ्यास

व्यवसाय : भारतीय नौकानयन महामंडळातून निवृत्त

छंद : बर्‍यापैकी स्कॉलर असल्याने बरेचसे शिक्षण स्कॉलरशीप विद्यावेतनांतून झाले.
आयुष्याच्या प्रत्येक अंगाला, कोपर्‍यांना स्पर्शून जाण्याच्या दुर्दम्य इच्छेपोटी जगण्यातील वास्तवता जाणून घेण्यास सदैव प्रयत्नशील राहिलो/प्रयत्नशील आहे. हा एक अनोखा छंद!
अ) जीवनांतील सर्वस्पर्धांपासून सदैव दूर राहून आनंद निर्मितीच्या ध्यासापोटी सदा पहिल्या ओळीत/पंक्तीत रहा्याचा माझा प्रयत्न आहे, प्रयास आहे.
ब) केवळ निखळ आनंद निर्मिती हाच उद्योग/उद्देश मनीं बाळगून नाना विध उखाणे/काव्य लेखन/निबंध लेखन/इतर प्रवास वर्णनपर लिखाण, सुमारे पंचेचाळीस वर्षांपासून सुरु आहे.
क) प्रसिद्धि आणि प्रकाशनापासून दूर रहाणे पसंत—- छपाई टाळली.
ड) काव्य गायनाचे/काव्य वाचनाचे शेकडो कार्यक्रम अनेक ठिकाणी/नानविध समारंभांत करण्याचा योग आला आणि असे योग – आनंद निर्मितीचे क्षण-लीलया जुळुन आलेले योग साधण्याकडे कल आहे, ती माझी प्रकृती आहे.
इ) वास्तवाच्या माध्यमांतून जीवनाची पुण्य-वाटिका मोदाच्या मधुगंधाने पल्लवित करुन, फुलविणे, मोहोरविणे हाच एकमेवध्यास उरी बाळगून जीवन प्रवास निरंतर सुरु आहे आणि तसा तो शेवटच्या क्षणापर्यंत सुरुच राहील कारण माझी गुरुदत्त माऊलीच माझी प्रेरणा आहे.
फ) दत्तभक्ती कुळांत पूर्वापार चालत आली आहे माझे आजोबा वडिलांचे पिताश्री-परम दत्तभक्त होते. गुरुचरित्राची शेकडो पारायणे त्यांनी केली. अशा या दत्तभक्त आजोबांना गाणगापूर मुका्कामी श्रीगुरुदत्तात्रयांच्या सदेह दर्शनाचा योग आल्याचे माझ्या आजीने सांगितले, काही अविश्वसनीय किस्से सांगितले, ते मनी साठवून ठेवले. तसेच माझ्या वडिलांनी, त्यांना दत्तमाऊली दर्शन घडल्याचा प्रसंग मला सविस्तरपणे कथन केला. अशा कुटुंबात माझा जन्म झाला हे मी माझे भाग्य समजतो.
ग) माझी दत्तभक्ती नगण्य आहे. पूर्वपुण्याई पाठीशी असल्याचे जाणवते. काही अनुभवांचा – गुरुमाऊली स्पर्शाच्या अनुभवांचा अपवाद वगळता माझी दत्तभक्ती अगदीच तुटपुंजी/खुजी आहे.——“गुरुदास” होणेच मी माझे भाग्य समजतो. माऊलीच माझे प्रेरणा स्थान आहे.
जे जे लिखाण झाले, ते कसे झाले, मलाही ठाऊक नाही. त्याच्याच प्रेरणेने सुचत गेले, मी लिहीत गेलो, आनंद लहरी-नव्हे तरंग निर्माण करण्याचा हा खारुताईचा वाटा आहे.

नामाचा – भगवत् नामाचा – महिमा अपरंपार अहे, हे त्रिकालाबाधित सत्य आहे, अशावेळी ओठी शब्द तरळतात :

नादांत नादांच्या, नित्यनेमाने,
लागून नादी, नादावलो तरी,
जीवनी निखळ नाद नाही निनादला ।
परी,
नामांत माऊलीच्या राहुनि मग्न,
डुंबतांच भक्ती-सागरी,
माऊली चरण-स्पर्श झाला, माझिया मस्तकाला ।
माऊली चरण-स्पर्श झाला, माझिया मस्तकाला ।।

माझ्या अल्प कल्पनेचा रसिकांना स्वल्पकासा का होईना लाभ मिळावा ।
आनंदप्राप्ती व्हावी, हाच एकमेव या वेबसाईट निर्मितीचा उद्देश.

पत्ता :
१०/११ “राधा-निवास”,
गोखले मार्ग, मुलुंड (पूर्व)
मुंबई – ४०००८१
दूरध्वनी : ०२२-२१६३६३३०
भ्रमणध्वनी : ९७०२५४०००६/९०९६५११६८८/९९२२४६०४९३

####
लेखक, कवी