लेखक, कादंबरीकार, कथाकथनकार अशी ख्याती असलेल्या व.पु. काळे अर्थात वसंत पुरुषोत्तम काळे यांचा जन्म २५ मार्च १९३३ रोजी झाला. वसंत पुरुषोत्तम काळे हे पेशाने वास्तुविशारद होते.
“आपण सारे अर्जुन”, “गुलमोहर”, “गोष्ट हातातली होती!“, “घर हलवलेली माणसे”, “दोस्त”, “माझं माझ्यापाशी?”, “मी माणूस शोधतोय”, “वन फॉर द रोड”, “रंग मनाचे”, “माणसं”,“प्लेझर बाँक्स भाग १ आणि २”, “वपुर्वाई”, “वपुर्झा़”, “ हुंकार” असे पत्रसंग्रह, व्यक्तीचित्रे, ललितप्रकार खुपच प्रसिध्द आहेत. तसंच “तप्तपदी”, “ठिकरी”, “पार्टनर”, “ही वाट एकटीची” यासारख्या कादंबरी खुपच गाजल्या; व.पु काळेंना “महाराष्ट्र शासनाचा उत्तम लेखकाचा सन्मान”, “पु.भा.भावे पुरस्कार”, “फाय फाउंडेशनाचा पुरस्कार” आणि अमेरिकेत आयोजित करण्यात आलेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद बहाल केले गेले.
२६ जून २००१ रोजी हृदयविकाराच्या झटक्याने व.पु.काळेंचे मुंबईत निधन झाले.
(लेखन व संशोधन – सागर मालाडकर)
व.पु. काळे यांच्यावरील मराठीसृष्टीवरील लेख.
प्रख्यात लेखक व. पु काळे (27-Mar-2017)
प्रख्यात लेखक व. पु काळे (27-Jun-2017)