विष्णुदास अमृतराव भावे

Vishnudas Amrutrao Bhave
जन्म दिनाक: १८१९
मृत्यू दिनांक: ९ ऑगस्ट १९०१

विष्णुदास अमृतराव भावे हे मराठी नाटककार होते. त्यांचा जन्म १८१९ साली झाला. ते आधुनिक मराठी नाट्यपरंपरेचे जनक मानले जातात.

विष्णुदास भाव्यांचा जन्म सांगली संस्थानाचे राजे चिंतामणराव पटवर्धन यांच्या पदरी असणार्‍या अमृतराव भावे व त्यांच्या पत्नी यांच्या पोटी झाला. कर्नाटकातील भागवत मंडळी कीर्तनी ‘खेळ’ करीत त्याप्रमाणे खेळ रचण्याची चिंतामणराव पटवर्धनांनी भाव्यांना आज्ञा केली.

१८४३ साली राजांच्या पाठबळावर भाव्यांनी सीता स्वयंवर हे मराठीतील पहिले नाटक उभारले. सांगली संस्थानाच्या राजवाड्यातील ‘दरबार हॉलात’ नोव्हेंबर ५, १८४३ रोजी या नाटकाचा पहिला खेळ झाला. त्यांचा मृत्यू ९ ऑगस्ट १९०१ रोजी झाला.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.