वयाच्या सोळाच्या वर्षांपासून व्यंगचित्रकलेला सुरुवात करणारे आणि बी.इ., एम.इ. व एम.बी.ए. असे शिक्षण घेतलेले लेखक विवेक मेहेत्रे सर्वच ठाणेकरांना परिचित आहेत. मराठी, इंग्रजी, गुजराथी, इ. भाषांमध्ये त्यांची व्यंगचित्र प्रसिद्ध झाली आहेत. आजवर ६० हजारचित्र व हास्य चित्रे त्यांच्या नावावर जमा आहेत.
मनातील ठाणे :
कालचे ठाणे शांत होते. छोटे होते. आजचे ठाणे अतिशय विस्तृत, सर्व बाजूंनी गजबजलेले झाले आहे. उद्योग धंदे, कारखानदारी वाढली आहे. ठाणे प्रगतीपथावर आहे. ते तसंच रहावं यासाठी प्रशासनाबरोबरीनेच नागरिकांच्या एकजूटीचीही गरज आहे. ठाणे हे मुंबई पाठोपाठ विकसित झालेलं महानगर आहे. त्यामुळे आपलं ठाणे सुंदर ठेवण्यासाठी आपण नागरिकांनीही सजग असायला हवं. प्रशासनानी एखादी चूक केली तर ती आपण सतत बोलून दाखवतो पण तेच एखादं चांगलं काम केलं तर आपण त्यावर काहीच बोलत नाही, ही विचारसरणी बदलायला हवी; तरच भविष्यातलं ठाणे हे तुमच्या, माझ्या सर्वांच्याच मनात जसं आहे तसं दिसेल, असं विवेक मेहेत्रे यांना वाटतं.
पुरस्कार : “चला…वापरू इंटरनेट”, “तुमचा नवा दोस्त इंटरनेट”, “ई-मेल”, “इ-कॉमर्स”, व अन्य पुस्तके प्रसिद्ध आहेत. “तुमचा नवा दोस्त इंटरनेट” या पुस्तकाला राज्य शासनाचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे. तसेच उत्कृष्ट व्यंगचित्रकलेसाठी असलेला शं. वा. किर्लोस्कर पुरस्कार सन २००० व २००९ असा दोन वेळा मिळाला आहे. “हास्य कॉर्नर“ या पुस्तकाला श्री. बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वाद आणि माधव गडकरींची प्रस्तावना लाभली आहे.