१९१४> मराठी कथाकार, विचारवंत आणि स्वातंत्र्यसेनानी वामन चोरघडे यांचा जन्म. “सुषमा” हा त्यांचा पहिला कथासंग्रह त्यानंतर “हवन”, “यौवन”, “प्रस्थान”, “पाथेय”, “संस्कार”, “नागवेल”, “मजल”, “बेल”, “ख्याल”, “ओला दिवस” असे अनेक कथासंग्रह प्रसिद्ध झाले. विविध प्रकृतींची माणसे त्यांच्या कथांतून भेटतात. चंद्रपूर येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली होती. त्यांच्या स्वतंत्र, अनुवादित, संपादित ग्रंथांची संख्या जवळजवळ ७५ च्या घरात जाते.
mss