लोककवी वामनदादा कर्डक यांचा जन्म १५ ऑगस्ट १९२२ रोजी झाला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना १९४० साली भेटून पुढे त्यांच्या काही सभांमध्ये गाण्याची संधी वामनदादांना मिळाली होती.
त्यांचे चार काव्यसंग्रह त्यांच्या हयातीत प्रकाशित झाले. परंतु
“सांगा आम्हाला बिर्ला, बाटा, टाटा कुठं हाय रं।
तुमचा धनाचा साठा न् आमचा वाटा कुठं हाय रं।।”
हे आक्रमक शब्दांतले समतागीत, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचे वर्णन करणारी अनेक गीते वा “बाबा तुझ्या मताचे जर चार लोक असते” हे आजच्या राजकारणावरील टीकागीत, अशी लोकांच्या ओठांवर असणारी कित्येक गाणी, हे त्यांचे संचित।
## Wamandada Kardak