यशवंत दिनकर फडके

Yashwant Dinkar Phadke
जन्म दिनाक: ३ जानेवारी १९३१
मृत्यू दिनांक: ११ जानेवारी २००८

यशवंत दिनकर फडके हे मराठी चरित्रलेखक, इतिहाससंशोधक होते. ते २००० साली बेळगाव साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते.

फडक्यांचा जन्म सोलापूर येथे जानेवारी ३, १९३१ रोजी झाला. त्यांचे वडील स्वातंत्र्य चळवळीत उतरले होते. स्वातंत्र्य चळवळीमुळे वडिलांचे कुटुंबाकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे फडक्यांना शिक्षणासाठी बरीच धडपड करावी लागली. सोलापुरातील ’हरीभाऊ देवकरण हायस्कूल’ शाळेत त्यांचे शालेय शिक्षण झाले. शालेय शिक्षण चालू असताना त्यांनी द्वा.भ. कर्णिकांच्या ’संग्राम’ वृत्तपत्रातून लेखनही केले.

१९४७ साली मॅट्रिक परिक्षा उत्तीर्ण झाल्यावर महाविद्यालयीन शिक्षणाकरता ते पुण्यास गेले. राज्यशास्त्र हा विषय घेऊन पुणे विद्यापीठातून त्यांनी बी.ए. (१९५१) व एम्‌.ए. (१९५३) या पदव्या मिळवल्या. पुढे १९७३ साली त्यांनी मुंबई विद्यापीठाकडून पीएच्‌.डी. पदवी मिळवली. त्यांचा मृत्यू ११ जानेवारी २००८ रोजी झाला.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.