मधुकर वामन धोंडे यांनी मराठी काव्य व साहित्याचे विविधांगी चिंतन मांडून समीक्षेला झळाळी दिली.
काव्याची भूषणे, मर्हाटी लावणी (संपादन), ज्ञानेश्वरी : स्वरुप, तत्वज्ञान आणि काव्य, ज्ञानेश्वरीतील लौकिक सृष्टी, चंद्र चवथीचा, जाळ्यातील चंद्र, तरिही येतो वास फुलांना ही पुस्तके, तसेच अनेक संशोधनपर लेख त्यांनी लिहिले.
यापैकी “… लौकिक सृष्टी” ला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला.
मधुकर वामन धोंडे यांचे ५ डिसेंबर २००७ रोजी निधन झाले.
मराठी काव्य व साहित्याचे चिंतक
# Madhukar Waman Dhonde