१८९३> नारायण धोंडो ताम्हणकर यांचा जन्म. १९३० ते ६० या तीन दशकांतील पुरोगामी व बुद्धिवादी मराठी समाज घडवण्यात ताम्हणकरांच्या साहित्याचे अप्रत्यक्ष, पण महत्वाचे योगदान आहे. “गोट्या”, “चिंगी” व “खडकवासला अंकुर” ही त्यांची गाजलेली पुस्तके, तर “चकमकी”, “अनेक आशीर्वाद” या पुस्तकांतून त्यांनी आजही कायम असणर्या कौटुंबिक प्रश्नांची चर्चा केली. “ग्यानबा-तुकाराम” हा पत्रसंग्रह, “मामा”, “गुजाताई” या कादंबर्या तसेच काही नाटकेही त्यांनी लिहिली होती.
mss