डॉ. रामचंद्र शंकर उर्फ रा. शं. वाळिंबे हे थोर समीक्षक म्हणून ओळखले जातात. ते व्यासंगी विद्वान आणि आपल्या ओघवत्या वाणीने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करून टाकणारे ख्यातनाम वक्ते म्हणूनही प्रसिद्ध होते. त्यांचा जन्म ९ नोव्हेंबर १९११ रोजी झाला.
ज्ञानेश्वरीतील विदग्ध रसवृत्ति, राजकारणी संत समर्थ रामदास, साहित्याचा ध्रुवतारा, वाङ्मयीन टीका – शास्त्र व पद्धती, साहित्यमीमांसा, मराठी नाट्यसमीक्षा, केशवसुत : काव्य व परामर्श अशी त्यांची पुस्तकं प्रसिद्ध आहेत.
रा शं वाळिंबे यांचे ८ फेब्रुवारी १९८९ रोजी निधन झाले.