Latest Name Asc Name Desc  

रामदास भटकळ

पाप्युलर या मराठी साहित्यविश्वामधील अग्रणी समजल्या जाणार्‍या पुस्तक प्रकाशन संस्थेचे रामदास भटकळ हे संस्थापक आहेत. रामदास भटकळ यांचा जन्म ५ जानेवारी १९३५साली झाला. त्यांचे शालेय शिक्षण रॉबर्ट मनी हायस्कूल, तर एलफिन्स्टन महाविद्यालयातून पदवी, चर्चगेटच्या गव्हर्नमेन्ट लॉ कॉलेज येथे एल.एल.बी त्यानंतर मुंबई विद्यापीठून राज्यशास्त्र विषयातून एम.ए.पूर्ण केले.

१९५२ मध्ये पॉप्युलर बुक डेपोच्या मराठी प्रकाशनाचे रामदास भटकळ यांनी कामाला सुरूवात केली. तर १९५८ पासून इंग्रजी प्रकाशनाच्या कामाला सुरुवात केली. १९६१ साली प्रकाशन व्यवसायासंबंधी प्रशिक्षणासाठी लंडनच्या “इंग्लिश युनिव्हर्सिटीज प्रेस”मध्ये तीन महिन्याची नोकरी करुन प्रकाशन कामाचा अनुभव घेतला. त्यानंतर इंग्लंडच्या ग्रंथव्यवहाराचा अभ्यास देखील. १९६५ रोजी यु.एस.स्टेट डिपार्टमेन्टच्या निमंत्रणावरुन अमेरिकन ग्रंथव्यवहाराचा अभ्यास केला.

“बॉम्बे बुकसेलर्स अॅण्ड पब्लिशर्स असोशिएशन” व “कॅपेक्सिल” या निर्यातदारांच्या संस्थेच्या “बुक्स अॅन्ड पब्लिकेशन पॅनेल”चे अध्यक्षपद रामदास भटकळ यांनी भुषविले आहे.

“द पोलिटिकल आल्टर्नेटिव्हस इन इंडिया”, “जिगसॉ”, “मोहनमाया”, “जगदंबा”, “रिंगणाबाहेर” या पुस्तकांचे रामदास भटकळ यांनी लेखन केले आहे. “फ्रँकफुर्ट” येथे आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय पुस्तक प्रदर्शनात पाच वेळा सहभाग देखील नोंदवला आहे. महाराष्ट्र शासनाच्या उत्कृष्ट प्रकाशनाच्या पहिल्या पुरस्काराचे भटकळ मानकरी आहेत.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.