जन्म : ३०.११.१९३० नाशिक येथे
सुरूवातीस ३ वर्षांचा लष्करी अनुभव घेऊन तेथून निवृत्त झाल्यानंतर कोरा ग्रामोद्योग केंद्र, बोरिवली येथे ७ वर्षे नोकरी. त्यानंतर गुजरात खादी ग्रामोद्योग साबरमती, अहमदाबाद येथे १७ वर्षे नोकरी. त्यानंतर जिल्हा परिषद राजकोट व जिल्हा परिषद अहमदाबाद येथे दहा वर्षांची नोकरी करून
निवृत्त.
लेखन : वडिल श्री. नाथ निफाडकर त्यांच्या जमान्यातील लेखक व कवी असल्याने परंपरागत गुण उतरला. मराठी डायजेस्ट अमृत, नाशिक साठी १९६० पासून लिखाण. अनेक लेख लिहिले. दैनिक गुजरात समाचार, श्री सिनेसाप्ताहिक, अखंड आनंद, कुमार गांधीनगरहून प्रकाशित समाज मित्र साठी एकूण सुमारे २५० लेख लिहिले. १-१२-२००३ पासून “मराठी माणसं” या साप्ताहिकाच्या (आता मासिक) सह-संपादक पदावर काम करीत आहे. “मराठी माणसं” नियतकालिकांतही सुमारे २५० लेख लिहिले.