यदुनाथ दत्तात्रय थत्ते

Yadunath Dattatray Thatte
संपादक
जन्म दिनाक: ५ ऑक्टोबर १९२२
मृत्यू दिनांक: १० मे १९९८

‘साधना’ला मराठी वृत्तपत्रसृष्टीत वैचारिक प्रतिष्ठा मिळवून देणारे संपादक यदुनाथ दत्तात्रय थत्ते यांचा जन्म ५ ऑक्टोबर १९२२ रोजी झाला.

महाविद्यालयीन शिक्षण घेतानाच यदुनाथ दत्तात्रय थत्ते यांनी १९४२ च्या आंदोलनात उडी घेतली. कारावासही भोगला. स्वातंत्र्योत्तर काळात साने गुरुजी आणि आचार्य विनोबांची शिकवण उराशी घेऊन ती आचरणात आणली. १९५६ ते ८२ पर्यंत साने गुरुजींच्या ‘साधना’ साप्ताहिकाचे ते संपादक होते.

मराठी, हिंदीतून त्यांनी अनेक पुस्तके लिहिली. धर्मनिरपेक्ष नीतिशिक्षणाची दिशा दाखविणारे ‘प्रतिज्ञा’, राष्ट्रीयत्वाची जाणीव जागृत करणारे ‘आपला मान, आपला अभिमान’ हे पुस्तक, ही त्यांच्या पुरस्कारप्राप्त ग्रंथाची ठळक उदाहरणे. केंद्र व राज्य शासनाचे अनेक पुरस्कार त्यांना लाभले.

साने गुरुजी कथामाला, बाबा आमटेंची भारतजोडो यात्रा, निगडित असणारे थत्ते ‘प्रेस कौन्सिल’चे अध्यक्षही होते. यदुनाथ दत्तात्रय थत्ते हे साने गुरुजी यांचे शिष्य होते. यदुनाथ दत्तात्रय थत्ते यांचे निधन १० मे १९९८ रोजी झाले.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.