आप्पासाहेब खाडिलकर

यशवंत कृष्ण
Appasaheb Khadilkar
नवाकाळचे दुसरे संपादक
जन्म दिनाक: १५ जानेवारी १९०५
मृत्यू दिनांक: ११ मार्च १९७९

नवाकाळचे दुसरे संपादक यशवंत कृष्ण उर्फ आप्पासाहेब खाडिलकर यांचा जन्म १५ जानेवारी १९०५ रोजी झाला.

१९२९ मध्ये कृष्णाजी प्रभाकर उर्फ काकासाहेब खाडिलकरांनी सत्याग्रहात भाग घेतला आणि त्यांना १९२७ आणि १९२९अशी दोनदा राजद्रोहाच्या आरोपाखाळी तुरूंगवासाची शिक्षा भोगावी लागली. त्यांच्या शिक्षेच्या काळात नवाकाळची जबाबदारी यशवंत कृष्ण उर्फ आप्पासाहेबांवर आली. ती त्यांनी समर्थपणे पेलल्यामुळे काकासाहेब तुरूंगातून परत आल्यानंतर देखील नवाकाळचे संपादकपदी आप्पासाहेब कायम राहिले.

चळवळीचं आणि पत्रकारितेचं बालकडू आप्पासाहेबाना घरातच मिळालं. त्यांचे वडील कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांच्या देखरेखी खालील आप्पासाहेबांची पत्रकारिता सुरू झाली. काकासाहेब चळवळीतले कार्यकर्ते. लोकमान्य टिळकांच्या विचारांनी प्रभावित झालेले आणि केसरीत लोकमान्यांसमवेत काम केलेले काकासाहेब नवाकाळमधून देखील केसरी प्रमाणेच भूमिका पार पाडत होते.

आप्पासाहेबांनी हे सारे सहन करीत नवाकाळ निष्ठेने चालू ठेवला. हे करताना वृत्तपत्रिय स्वातंत्र्य आणि ते टिकविण्यासाठी लागणारा स्वाभिमान कधी ढळू दिला नाही. कॉग्रेसच्या विचारांचा पुरस्कार हे नवाकाळचे प्रथमपासूनचे धोरण होते. आप्पासाहेबांनी त्यात बदल केला नाही.

१९४२-४३ मध्ये मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्षपद त्यांनी सांभाळले. १९४४ मध्ये मराठी पत्रकार परिषदेच्या अधिवेशनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते.

आप्पासाहेब खाडिलकर साहित्यिकही होते.त्यांनी संसारशकट, सदानंद, आजकाल या तत्कालिन समाजस्थितीचे चित्रण करणाऱ्या कादंबऱ्या देखील लिहिलेल्या होत्या.

आप्पासाहेब खाडिलकर यांचे ११ मार्च १९७९ रोजी निधन झाले.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.